रायगड विषयी संपुर्ण माहिती देणारा mahaparyatan.com चा हा व्हीडिओ खास आपल्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहे l मराठा साम्राज्याची राजधानी रायगडावर हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला होता l त्याच रायगड विषयी संपुर्ण माहिती देणारा mahaparyatan.com चा हा व्हीडिओ खास आपल्यासाठी. Video बघितल्यावर अभिप्राय जरुर कळवावा…
‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती. या संस्कृतीच्या प्रतिमा निर्मितीचे महत्त्वपूर्ण असं कार्य ‘गाईड’ ला पार पाडावे लागते. पर्यटकांचा मित्र म्हणून आतिथ्यशील वर्तनाने त्यांना मदत करावी लागते. आपल्या नैतिक जबाबदाऱ्यांसह पर्यटकांचा विश्वास संपादन करावा लागतो. गाइडच्या अंगी सौजन्यपूर्ण, सक्षम, चतूर, क्षमाशील, समंजस असे गुणही असणे महत्त्वाचे असते. यातूनच आदरातिथ्याचे दर्शन घडते.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, पर्यटन संचालनाल तर्फे राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड – travel guide) प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. पर्यटन संचालनालयाने शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे करण्याचे ठरवण्यात आली असल्याची माहिती आहे.
पर्यटन संचालनालय कोकण विभागातर्फे गाईड प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आलेत. सात ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात सुमारे दोनशे युवकांनी या शिबिराचा लाभ घेतला. अधिकृत ट्रॅव्हल गाईड म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र आणि परवाना देण्यात आला असल्याची माहिती श्री हनुमंत हेडे – उपसंचालक (पर्यटन) पर्यटन संचालनालय कोकण विभाग, नवी मुंबई यांनी महापर्यटनला दिली. त्यात किल्ले रायगडावर चाळीस जणांना ही अधीकृत गाईड म्हणून मान्यता देण्यात आली.
त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराची उत्तम संधी म्हणूनही याकडे पाहता येईल. तसेच शहरे, पर्यटनस्थळी पूर्ण वेळ काम, पर्यटन क्षेत्रातल्या संस्थांकडे रोजगाराची संधीही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे ll होय! आम्ही रायगडाचे गाईड ll