कशी असते कोकणातील दहीहंडी जाणुन घेण्यासाठी हा व्हीडिओ नक्की बघा
श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव कोकणासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोकुळाष्टमी म्हटले, की आठवते ढोलताश्यांच्या गजरात ठेका धरणारी तरुणाई, रंगीबेरंगी पताकांच्या गर्दीत उंच बांधलेली दहीहंडी. लोकांची अमाप उत्साह, दहीहंडी फोडण्यासाठी विविध क्रीडा मंडळांच्या तरुणांमध्ये असलेली चुरस. एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते.
एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात गोल रिंगण करत विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात.पोहे, कुरमुरे आणि दही-दुधाने भरलेली हंडी उभी केली. एका गोविंदाने ताशा वाजवण्याची कामगिरी घेतली. खांद्याला खांदा देणारे सवंगडी आणि एकावर एक अगदी सर्राईतपणे चढणारा चिमुकला गोविंदा यांचा उत्साह बघण्यासारखा होता. त्यांनी हंडीभोवती गोलाकार रिंगण करून “गोऽविंदा रे गोऽपाळा” हा गजर करीत फेर धरून ठेका धरण्यास सुरुवात केली.
सुमारे दहा पंधरा मिनिटांच्या नृत्यानंतर तीन थरांचा मनोरा रचून एका चिमुरड्या गोविंदाने पहिल्याच प्रयत्नात ही हंडी यशस्वीरित्या फोडली.मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द आणि अमाप उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
भगवान श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी गोपींच्या घरात शिरून वर टांगून ठेवलेल्या शिंकाळ्यातून लोणी खाण्यासाठी मनोरे रचायचे आणि मडकी फोडायचे, त्या स्मृतिच या खेळातून भारतभर जागविण्यात येतात.
कोकणांत गोकुळाष्टमी म्हणजे बालगोपालांचा आवडता सण. गावातील युवक एकत्र येत तीन थरांची छोटीशी दहीहंडी बांधून पारंपरिक वाद्यांच्या तालावर फेर धरला जातो. मानवी मनोरा बनवत वरच्या थरावर असलेला गोविंदा हंडी फोडतो. मोठ्या जल्लोषात कृष्ण जन्म आणि गोकुळाष्टमी सण साजरा केला जातो.
दापोली तालुक्यातील समुद्र किनारी असलेले कोळथरे गावातली रहिवासी माधव काका महाजन यांनी पाठवलेला सुंदर व्हीडिओ खास mahaparyatan च्या प्रेक्षकांसाठी….
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (6)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,125)
- Mahaparyatan Business (4)
- Uncategorized (9)
- ऐतिहासिक ठिकाणे (15)
- कथाकथन / प्रवासवर्णन (1)
- कृषी पर्यटन (16)
- कृषी माहिती आणि उत्पादने (90)
- खाद्य भ्रमंती (6)
- गड, सागरी किल्ले (10)
- धबधबे (5)
- परंपरा / सण / उत्सव (19)
- प्राचीन देवस्थाने (45)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (29)
- समुद्रकिनारे (12)
- साहसी पर्यटन (6)