श्री शिव समर्थ गढ, डेरवण
शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले शिवकालीन प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
कोकण-गोवा महामार्गावर चिपळूण शहरापासून १४ किमी अंतरावर सावर्डे गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर डेरवण हे गाव असून या ठिकाणी श्री संत सितारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोकणातील सर्वात पहिली भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.
शिवसमर्थ गडाच्या तटबंदी सदृश भिंतींत छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगशिल्पे कोरण्यात आली आहेत. शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले ऐतिहासिक प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
शिव जन्म, स्वराज्य स्थापनेची शपथ, भवानी मातेकडून दिव्य तलवार स्वीकारतांना महाराज, रामदास स्वामींचे आशीर्वाद घेतांना, शाहिस्ते खानाची लाला महालात बोटं कापल्याचा प्रसंग, अफजल खानाचा वध , शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्पं अत्यंत अप्रतिम असेच आहेत.
येथे स्त्री पुरुषांना पारंपारीक वेषभूषेतच प्रवेश देण्यात येतो . सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत शिवसृष्टी पर्यटकांना पाहण्यासाठी खुली असते.
सितारामबुवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डेरवण येथेच भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधानी सुसज्य अश्या या रुग्णालयात गोरगरिबांना वाजवी शुल्कात आरोग्य सेवा दिली जाते.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन