Garva Beach Resort, Kolthare, Dapoli
Garva Beach Resort, Kolthare, Dapoli…..
Beach touch resort in Kolthare, near Dapoli. Peaceful, clean, full of natural beauty and virgin beach. Cottages surrounded with coconut and beetle nut trees
कोळथरेचा समुद्र किनारा आणि गारवा रिसॉर्ट विषयी संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ फक्त “महापर्यटन” च्या खास प्रेक्षकांसाठी……….
Contact – Mr. Anand Bhave
Garva Beach Resort, Kolthare, Dapoli Mobile : 7066724427
भाविक आणि हौशी पर्यटकांसाठी समुद्र किनाऱ्यावर राहण्याची आणि कोकणातील पारंपरिक भोजनाचा आनंद घेण्याची उत्तम व्यवस्था गारवा रिसॉर्टमध्ये होऊ शकते. गारवा रिसॉर्ट हे दापोलीपासून 30/35 किलोमीटर लांब असले तरी समुद्र किनारी नारळ पोफळीच्या गर्द छायेत दडलेल्या कॉटेजेस मध्ये राहण्याचा आनंद पर्यटक लुटतात.
सी फूड मध्ये – पारंपरिक मसल्यामध्ये तयार करण्यात येणाऱ्या पॉपलेट, सुरमई फ्राय / करी म्हणजे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेतच. त्याचबरोबर कोकणी व्हेज पदार्थांमध्ये डाळिंब्यांची उसळ, उकडीचे मोदक, आंबोळी, पानग्या, कुळीथ पिठले, ओल्या काजूची भाजी, फणसाची भाजी सोलकढी यासह अनेक प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत.
चुलीवरचे भोजन आणि अल्पोपहार व्यवस्था – गारवा बीच रिसॉर्टची अजून एक खासियत म्हणजे येथे तयार होणारे सगळेच पदार्थ हे चुलीवर शिजवले जातात. अर्थातच व्हेज आणि नॉन व्हेज किचन हे वेगवेगळे असल्याने सात्विक भोजनाचा आनंद येथे घेता येतो.
लहान मुलांसाठी छोटा स्विमिंग टॅंक म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. रिसॉर्ट परिसरात झोपाळे, अनेक प्रकारचे खेळ प्रकार ही आहेत. यासह समुद्र किनारी वाळूत किल्ले बनवण्याचा आनंद लहानगे नक्कीच येथे लुटू शकतात.
उन्हाळ्यात फणसाचे गरे आणि हापूस आंब्याचा रस ही उपलब्ध असतो. मामाच्या गाव तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही या रिसॉर्टला नक्कीच भेट दिली पाहिजे.
येथे कसे जायचे – पुण्याहून मुळशी मार्गे दापोली 193 किलोमीटर तर मुंबई येथून 218 किलोमीटर अंतरावर असलेले दापोली हे तालुक्याचे ठिकाण. दापोलीहुन बुरोंडी-लाडघर मार्गे आल्यास 20 किलोमीटर अंतरावर आणि दापोली जालगाव- नानटे मार्गे आल्यास अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर कोळथरे गाव आहे. समुद्रकिनारी वसलेले निसर्गरम्य परिसरात वसलेले छोटेसे गाव.
कोळथरे गावात समुद्राच्या अगदी निकट असलेले गारवा बीच रिसॉर्ट विकेंड डेस्टिनेशन म्हणून ही प्रसिद्ध आहे
आपल्या पर्यटन व्यवसाय ग्लोबल करण्यासाठी संपर्क – 9422490885