सुवर्ण गणेशाचे आपल्याला यापुढे कधीही होऊ न शकणारे दर्शन, आता आपल्याला केवळ महापर्यटनच्या याच व्हिडिओमध्ये होऊ शकते.
खालील लिंक क्लिक करा, click the below link
एका दुर्दैवी घटनेत 24 मार्च 2012 रोजी ही सुवर्ण गणेश प्रतिमा चोरीस गेली
श्री सिध्दीविनायक सुवर्ण गणेश मंदिर, दिवेआगर
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव. विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ सुपारीच्या गर्दीत लपलेली कौलारू घरे असा निसर्गरम्य परिसर लाभलेले दिवेआगर गाव प्रसिद्धीस आले ते इथे सापडलेल्या श्री सुवर्ण गणेशामुळे. १७ नोव्हेंबर १९९७ साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे कलम लावत असताना तीस किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली होती. गावकऱ्यांच्या उपस्थितीत पेटी उघडली गेली असता आतमध्ये एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा होती. त्या पेटीमध्ये एका छोट्या तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढविण्यासाठी २८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार होते. ही गणेश प्रतिमा म्हणजे भरीव मूर्ती नसून मुखवटा आहे. ज्या मुर्तीवर हा मुखवटा चढवला जात असेल ती प्राचीन मूळ आणि भरीव मूर्ती मात्र मिळून आली नव्हती. सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर सापडली असल्याने प्रचलित कायद्यानुसार सरकारदरबारी जमा करण्यात आली नव्हती. सुवर्ण गणेश प्रतिमा आणि तांब्याची पेटी मंदिरात ठेवण्यात आली होती. सुवर्ण गणेश प्रतिमेवर मस्तक, कान, खांदे यावर चाफ्याची फुलं आणि पायरी आंबे कोरलेले दिसतात. यावरून ही मूर्ती प्राचीन असल्याची खात्री पटते.
सोन्याचे बाप्पा प्रकट झाले आणि दिवे आगर हे गाव पर्यटनस्थळ म्हणून उजेडात आले.
सुवर्ण गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले असेच म्हणावे लागेल. भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी गावात घरगुती निवासासाठी ‘होम-स्टे’ ही संकल्पना साकारली गेली. आलेल्या पाहुण्यांसाठी सर्व सोयींनी युक्त ‘सेल्फ कन्टेन्ड’ अशा खोल्या अस्तित्वात आल्या. समुद्र किनारी आणि गावात झालेल्या रिसॉर्ट्समुळे पर्यटकांची निवासाची चांगली सोय झाली. दिवेआगरचा शांत, सुरक्षित सागरकिनारा पर्यटकांना आवडू लागला. त्याचप्रमाणे घरगुती रुचकर गरमागरम शाकाहारी आणि मांसाहारी जेवण उपलब्ध होऊ लागल्याने दिवेआगरला पर्यटकांची गर्दी होऊ लागली. दिवेआगर येथील उकडीचे मोदक खूप प्रसिद्ध आहेत. इथे येणाऱ्या पर्यटकांनी साजुक तुपासह उकडीच्या मोदकांचा आस्वाद जरूर घ्यावा.
श्री सिध्दीविनायक मंदिरावर सशस्त्र दरोडा पडून सुवर्ण गणेश प्रतिमा चोरीस गेली होती
24 मार्च 2012 रोजी रात्री या मंदिरावर सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गणपती मंदिरात असलेली जवळपास दिड किलो वजनाची सोन्याची गणेश मुर्ती लुटून नेली होती. संपूर्ण कोकणाला आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत महादेव गोपाळ घडशी आणि अनंता बापू भगत या दोघा सुरक्षा रक्षकांचा लुटारूंनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. कालांतराने दरोडा टाकणारे सर्व आरोपी सापडले. त्यांच्याकडून वितळवलेले सोनेही मिळाले, पण सोन्याचा बाप्पा मात्र लुप्त झाला तो कायमचाच.
दिवेआगर परिसरातील इतर धार्मिक स्थळे
इथे उच्च प्रतीचे काजू, मसाल्याचे पदार्थ, पोह्याचे-तांदुळाचे पापड, पोह्याचे मिरगुंड, कडवे वाल, कोकम/आवळा सरबत असे अस्सल कोकणी प्रॉडक्ट्स वर्षभर उपलब्ध असतात. तसेच दिवेआगरची सुपारी देखील प्रसिद्ध आहे.
कोकण उत्पादनासाठी प्रसिद्ध दिवेआगर गाव
दिवेआगर येथील मोदक खूप प्रसिद्ध आहेत. इथे येणारे पर्यटकांनी उकडीच्या मोदकासह साजूक तुपाचा आस्वाद जरूर घ्यावा. उच्च प्रतीचे काजू, मसाले, पोह्याचे/तांदुळाचे पापड, मिरगुंड, कडवे वाल, कोकम/आवळा सरबत असे अस्सल कोकणी प्रोडक्ट्स येथे उपलब्ध असतात.
MAHAPARYATAN.COM
आमच्या युट्युब , फेसबुक , इंस्टाग्राम , ट्विटर पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका….. https://mahaparyatan.com/
Great Jobwork by Mahaparytan
Thanks
Thanks