महापर्यटनच्या प्रेक्षकांना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा
पर्यटनाशी संबंधित प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
“सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन” 2021 सालची थीम
आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) अर्थात संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली असल्याने १९८० पासून हा दिवस जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.
पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी 27 सप्टेंबर या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.
गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रदूर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार लावले गेलेले निर्बंध हळूहळू शिथिल करीत असल्याने मागील वर्ष/दीड वर्षापासून ठप्प असलेल्या व्यवसायांना पुन्हा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा पर्यटनावर आधारित व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर पर्यटकांची पावले परत निसर्गरम्य ठिकणांकडे वळू लागली आहेत
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने या व्यवसायाला पुन्हा उभारी यावी, अशी अपेक्षा.