सादरकर्ते : पराग पिंपळे, कोकणप्रेमी आणि कोकण पर्यटन अभ्यासक
अनुभव कथाकथन…
“किनारा मला पामराला”
(एका कोकणवेड्याच्या अनुभवकथा)
पराग पिंपळे यांचा थोडक्यात परिचय :- ‘साद सागराची’ या पुस्तकांसाठी (सहा पुस्तकांचा संच) फिल्ड रिसर्च, लेखन, संपादन, छायाचित्रण, ले-आऊट, डिझायनिंग आणि प्रकाशन अशी बहुअंगी जबाबदारी पार पाडणारे पराग पिंपळे हे लौकिकार्थाने वाणिज्य शाखा, आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवस्थापन आणि ॲडव्हरटायझिंग/डिझायनिंग या विषयातील पदवीधर असून त्यांना फोटोग्राफी आणि ऐतिहासिक वारशांचे जतन या विषयांमध्ये विशेष रस आहे.
पराग पिंपळे यांचा ‘साद सागराची’ हा पुस्तक-संच प्रकाशित होताच कोकणप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आजपर्यंत साद सागराची पुस्तकांच्या प्रत्येकी काही शे आवृत्या निघाल्या असून आजही ते पर्यटनप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.
कोकणच्या साद सागराची या पुस्तकांसाठी गळ्यात कॅमेरा आणि पाठीवर सॅक अडकवून रेवस ते रेड्डी असा ७०० कि.मी.चा पट्टा त्यांनी मोटारसायकलवरून अक्षरश: पिंजून काढला आहे. प्रत्येक भागात ३-४ दिवस मुक्काम ठोकून नव्या ठिकाणांचा शोध घेतलेला आहे. यासाठी त्यांनी कित्येक कोकणवाऱ्या केल्या आहेत. अंतरे पार करताना कोणते ठिकाण, किती कि.मी.वर आहे यात अचूकता येण्यासाठी मोटारसायकलच्या स्पिडोमीटरवरील रिडींग्ज वेळोवेळी डायरीत नोंदवली. ज्ञात-अज्ञात ठिकाणांना वारंवार भेटी देऊन त्या ठिकाणचे महत्त्व जाणून घेतले. एकच ठिकाण प्रत्येक ऋतूत, दिवसा रात्री अशा वेगवेगळ्या वेळेत जाऊन कसे दिसते हे पाहिले. सगळे व्याप सांभाळून एकेक विभाग फिरण्यासाठी त्यांना वर्षभराचा कालावधी लागला.
वेळ मिळेल तसा कधी पत्नी वर्षा यांना सोबत घेऊन, कधी मिळेल त्याची साथ घेऊन तर कधी एकट्याने केलेली ही भटकंती आहे.
या भटकंतीत कोकणातून फिरताना कधी वाट चुकून जंगलात रात्र काढावी लागली… कधी भरदिवसा लांडग्यांनी पाठलाग केला… कधी भलामोठा अजगरच वाटेवर आडवा आला तर कधी बिबट्याशी थेट नजरभेट झाली. अशा कितीतरी रोमांचक गोष्टी या भटकंती दरम्यान घडल्या, त्यातीलच घटना/प्रवास वर्णन यांचे अनुभव त्यांच्याकडूनच ऐकण्याची संधी महापर्यटनच्या प्रेक्षकांसाठी!
पराग पिंपळे यांनी गेली १८-२० वर्षे केलेली ही कोकण भ्रमंती कशासाठी, तर ते एकाच गोष्टीसाठी, ते म्हणजे न पोहोचलेले कोकण जगासमोर आणण्यासाठी, पर्यटकांना सजग करण्यासाठी, कोकणचा निसर्ग आणि इतिहास आवर्जून बघायला या हे सांगण्यासाठी…
लवकरच त्यांच्या या कोकण अनुभवांचे पुस्तक ‘किनारा मज पामराला’ या नावाने प्रकाशित होत आहे….
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन