Wednesday, August 5, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्रीदेव अंजनेश्वर, कसबा मिठगवाणे – VIDEO

गांधीतीर्थमध्ये नवीन अकर्षण दाखल l महात्मा गांधीजींची ऐतिहासिक सायकल

किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास येत्या दीड वर्षात पूर्ण करणार

श्रीदेव अंजनेश्वर, कसबा मिठगवाणे – VIDEO

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 15, 2022
464 5
0
645
SHARES
2.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
श्रीदेव अंजनेश्वर देवस्थान – हा VIDEO नक्की बघा

बारा गावचे जागृत स्वयंभू देवस्थान “श्रीदेव अंजनेश्वर, कसबा मिठगवाणे”

नवस फेडण्याची येथील वैशिट्यपूर्ण पद्धत – नवस फेडणाऱ्या पुरुषाने लोटांगण घालत मंदिराची परिक्रमा करणे आणि स्त्रीभक्ताने डोक्यावरच्या पदराने पालखीमार्ग साफ करण्याची प्रथा

मिठगवाणे गाव : गावाला हे नाव का पडले याची एक शक्यता सांगितली जाते ती अशी की, फार पूर्वी या गावात मोठ्या प्रमाणात मिठागरे होती. मोठ्या प्रमाणात मिठाची निर्मिती आणि ‘गवाण’ म्हणजे साठवणीची जागा म्हणून या गावची ओळख मिठगवाणे म्हणून झाली असावी.

त्या काळी लहान लहान होड्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर मिठाची वाहतूक येथे होत असे. कालांतराने मिठाची वाहतूक थांबल्याने इथली मिठागरे बंद पडली, पण गावाला पडलेले मिठगवाणे नाव मात्र तेव्हापासून व्यवहारात कायम राहिले.

इथे कसे पोहोचाल :
रत्नागिरी ते मिठगवाणे अंतर 62 किलोमीटर इतके आहे. राजापूर महामार्गाने हातीवले गावापाशी उजवीकडे वळल्यावर पुढे ३ किलोमीटर इतक्या अंतरावर जैतापूरचा फाटा येतो. या रस्त्याने पुढे गेले की जैतापूरच्या अलीकडे मिठगवाणे फाट्यावरून डावीकडे वळावे लागते. येथून वळल्यावर अंदाजे ३ किलोमीटर अंतरावर मिठगवाणे गाव येते.

गावात प्रवेश केल्यावर एका कमानीखालून जाणारा रस्ता थेट श्री देव अंजनेश्वर मंदिरापाशी घेऊन जातो.

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

मंदिर परिसर :
अंदाजे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वीचा इतिहास असणारे अंजनेश्वराचे पुरातन मंदिर हे बारा गावचे जागृत स्वयंभू देवस्थान म्हणून ओळखले जाते. चारही बाजूने जांभ्या दगडाची भक्कम तटबंदी असलेला मंदिर परिसर विस्तीर्ण आहे. चिरेबंदी प्रवेशद्वारावर नगारखाना असून तेथे जाण्यासाठी दगडी पायऱ्या केलेल्या आहेत.

महाद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर समोरच मोठे तुळशीवृंदावन आणि सात दगडी दीपमाळा असून बाजूलाच एक छोटीशी पाय विहीर दिसते.

मंदिर परिसरात अंदाजे पन्नास फूट उंचीचा एक ध्वजस्तंभ आहे. देवालयाच्या डाव्या बाजूस वैशिट्यपूर्ण विहीर असून तिचे पाणी गोड आणि औषधी आहे. खरूज, नायटा यासारखे त्वचारोग या पाण्याने बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. या विहिरीवर हातपाय धुऊन देवदर्शनाला जाण्याची पद्धत आहे. मंदिराच्या डाव्या हाताला गोमुख आहे.

मंदिराची बांधणी : या मंदिराच्या बांधकाम शैलीवर गोमंतकीय प्रभाव असल्याचे जाणवते. मंदिराचे शिखर कौलारू असून त्याचा आकार षट्कोनी आहे. कौलारू छप्पर असलेले सभामंडप, अंतर्गृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना असून, सभागृहात सुंदर नक्षीकाम असलेल्या भक्कम लाकडी खांबांच्या आधारावर छप्पर तोललेले आहे. अंतर्गृहात आकर्षक रंगसंगतीत रंगवलेले दोन अडीच फूट रुंदीचे भक्कम लाकडी खांब असून त्यावर देवदेवतांची आणि इतर चित्रे कोरलेली आहेत. लाकडी तुळयांवर आकर्षक नक्षीकाम दिसून येते. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एक सुंदर नंदीशिल्प आहे. उजव्या बाजूस काळ्या पाषाणातील दोन फूट उंचीची पुरातन गणेश मूर्ती असून डाव्या हाताला ठेवलेल्या लाकडी देव्हाऱ्यात नंदीवर विराजमान शिव शंकर आणि देवी पार्वतीची पितळी मूर्ती आणि उत्सवकाळात वापरात येणारा देवाचा पितळी मुखवटा आणि नागफणी ठेवलेली आहे.

गाभाऱ्यात भव्य शिवपिंडी असून त्यावर चांदीचा पंचमुखी नागफणा आहे. पिंडीवर असलेल्या पात्रातून सतत अभिषेक सुरू असतो. श्री देव अंजनेश्वराच्या नित्य पूजेचा मान गावातील लिंगायत समाजातील कुटुंबियांना मिळाला असून इथे वर्षभर होणाऱ्या सर्व धार्मिक पूजाविधी त्यांच्या मार्फत केली जाते.

आख्यायिका : फार पूर्वी एका ब्राह्मणाची गाय आज ज्या ठिकाणी महादेवाची पिंडी आहे तेथे एका शिळेवर पान्हा सोडत असे. तिथे खोदण्याचा प्रयत्न केला असता शिळेतून रक्त वाहू लागले. गावकऱ्यांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना तेथे स्वयंभू पिंडी दिसून आली. इथे दैवी शक्तिचा वास असल्याची श्रद्धा दृढ झाल्याने येथे नित्य पूजेची तेव्हापासून सुरुवात झाली ती आजतायागत सुरू आहे. पुढे गोखले वंशातील एका गृहस्थांनी येथे प्रथम छोटी घुमटी बांधली असल्याची माहिती मिळते. अंजनीच्या रानात सापडला म्हणून ‘अंजनेश्वर’ नावाने हे मंदिर पुढे प्रसिद्ध झाले.

वार्षिक सण उत्सव : देवालयाचे वर्षभरातील प्रमुख उत्सव म्हणजे महाशिवरात्री आणि कार्तिकी पौर्णिमा. महाशिवरात्री उत्सव हा तीन दिवसांचा आणि कार्तिकी पौर्णिमेचा उत्सव हा पाच दिवस साजरा केला जातो. कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेला जास्त महत्त्व असून या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. सकाळी आरती झाल्यावर पालखी सोहळ्यास सुरुवात होते. देव प्रदक्षिणेसाठी पालखीतून बाहेर पडतात. अंदाजे तासाभरानंतर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देव पुन्हा सभागृहात विराजमान झाल्यानंतर कीर्तन सोहळा पार पडतो. या वेळी इथे पंचक्रोशीतील गावांच्या भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. उत्सवकाळात कांबळी आणि काजवे ही दोन कुटुंब देवाचे भोई म्हणजे देवाची पालखी खांद्यावर वाहून नेण्याची सेवा बजावतात. भालदार म्हणून मसुरकर, अब्दागीर म्हणून मटकरी आणि कांबळी, चवरी बनवण्याचे काम देसाई आणि पटवर्धन कुटुंब बघतात, देवाच्या पालखीला दिवटी दाखवण्याचे काम मोहिते आणि पिंदावणकर कुटुंब आपली सेवा अर्पण करतात.

वैशिट्यपूर्ण नवस फेडायची पद्धत : हा देव नवसाला पावतो अशी ख्याती असल्याने नवस फेडण्यासाठी म्हणूनही भाविक येथे गर्दी करत असतात. इथली नवस फेडण्याची पद्धत वैशिट्यपूर्ण अशीच आहे. नवस फेडणाऱ्या पुरुषाने लोटांगण घालत मंदिराची परिक्रमा करणे आणि स्त्रीभक्ताने डोक्यावरच्या पदराने पालखीमार्ग साफ करणे याला दरबार झाडणे असे म्हणतात, अशा प्रथा पाळल्या जातात.

श्री काळभैरव मंदिर : मंदिर परिसरात कालभैरवाचे छोटेसे मंदिर आहे. हा देव गावाचा रक्षणकर्ता असल्याचे मानण्यात येते. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून बाधा होऊ नये म्हणून या देवाला नारळ वाहण्याची प्रथा आहे.

कुलदैवत : देसाई, ढमढेरे, नेने, गोखले, भुस्कुटे अशा अनेक कुटुंबे श्री अंजनेश्वराला आपला कुलस्वामी मानतात. यामुळे आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी म्हणून पुण्यामुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे वर्षभर येत असतात.

श्री गैबी पीर दर्गाह : मंदिराच्या डाव्याबाजूस भिंतीत असलेल्या एका कोनाड्यात दगडी स्मारक आहे. याबाबत एक दंतकथा अशी सांगितली जाते की, समुद्रात वादळात सापडलेल्या एका मुस्लिम नावाड्याने माझे जहाज सुखरूप किनाऱ्याला लागल्यास तुझे देऊळ बांधून देईन असा नवस अंजनेश्वरास बोलला. त्याचे संकट निवारण झाले म्हणून त्याने येथे देवालय बांधले. कालांतराने या नावाड्याने मंदिराच्या कळसावरून उडी मारून स्वतःचे प्राण त्याग केला होता अशी कथा ऐकावयास मिळते. त्याच्या स्मरणार्थ इथे स्मारकरूपी दर्गा बांधला गेला आहे. गावातील मुस्लिम बांधव इथे प्रार्थनेसाठी येत असतात

भक्तनिवास : या स्थळाला शासनाने यात्रा आणि पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असल्याने भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असून भाविक आणि पर्यटकांची गर्दी येथे होऊ लागली आहे. मंदिराच्या जवळच मंदिर संस्थान ट्रस्टद्वारे भक्तनिवासाची सोय केलेली आहे. बाहेरगावाहून येणारे भक्तगण अल्पदरात या भक्तनिवासाचा लाभ घेऊ शकतात. मिठगवाणे हे गाव छोटेसे असल्याने पूर्वकल्पना दिल्याशिवाय गावात चहा-नाष्ट्या भोजनाची सोय होऊ शकत नाही. मुख्य रस्त्यापासून थोडे एका बाजूला असले तरी आवर्जून जावे असे हे ठिकाण आहे.

धार्मिक कार्य, पूजा, अभिषेक आणि देणगीसाठी संपर्क साधावा – श्री देव अंजनेश्वरच्या कार्तिकोत्सवाला देणगी पाठवणे सुलभ आणि सोयीचे व्हावे म्हणून आपल्याला क्यूआर देत कोड आहे. या क्यूआर कोडच्या सहाय्याने आपण पेटीएम्, भीम,गुगल पे आदींच्या सहाय्याने श्री देवाच्या बँक खात्यात थेट पणे आपली देणगीची रक्कम पाठवू शकता. रक्कम पाठवल्यावर 9823277326 या व्हाटसअप नंबरला आपले पूर्ण नाव, पत्ता व पेमेंटचा तपशील कळवला की देणगी पावती, प्रसाद, अंगारा आपल्या पत्त्यावर घरपोच पाठवला जातो. तरी देणगी पाठवण्यासाठी क्यूआर कोडचा जरूर वापर करावा…. डॉ. मिलिंद देसाई : ट्रस्टी, श्रीदेव अंजनेश्वर, कसबा मिठगवाणे.

  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourismमाडबन समुद्र किनारामिठगवाणेश्रीदेव अंजनेश्वर मंदिर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In