Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे प्रसिध्द उद्योगपती अशोक जैन यांना निमंत्रण

महाराष्ट्राची संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकास तसेच पर्यटन वाढीच्या दृष्टीने 'महाराष्ट्र शक्तीपीठ' महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे प्रसिध्द उद्योगपती अशोक जैन यांना निमंत्रण

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 13, 2024
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीएपीएस मंदिराची (२७ एकर परिसरात विस्तार) भव्य रचना ही भारत व संयूक्त अमिराती यांच्यातील सांस्कृतिक सौहार्दाचे व मैत्रीचा पुरावा….. उद्योगपती अशोक जैन

जळगाव | संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्या दि. १४ फेब्रुवारीला होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना प्राप्त झाले आहे. धुळे येथील स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख आनंद स्वामीजी महाराज यांनी हे निमंत्रण अशोक जैन यांना प्रत्यक्ष येऊन सन्मानपुर्वक दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करून श्री. अशोक जैन हे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थितीत राहणार आहेत.

अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर जमीन दान केली होती. मंदिराच्या बांधकामासाठी ४०० दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे. अबू मुरीकाह जिल्ह्यातील बीएपीएस हिंदू मंदिर हे २७ एकरमध्ये विस्तारले आहे.

बीएपीएस हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे. गुलाबी राजस्थानी खडक व पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडापासून ते मंदिर बनवलेलं आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी अबूधाबीला नेले. मंदिराचे सात स्पायर्स प्रत्येक युएईच्या अमिरातीचे प्रतीक आहे. मंदिराच्या संकुलात अभ्यास केंद्र, प्रार्थना हॉल, थीमॅटिक गार्डन, शिक्षण क्षेत्र यांचा समावेश आहे. भूकंपाची शक्यता व तापमान बदल तपासण्यासाठी मंदिराच्या पायामध्ये १०० सेन्सर बसवण्यात आले आहेत.

अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अनुभवल्यानंतर अबुधाबीतील श्री स्वामीनारायण मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले. ही हृदय पुलकित करणारी घटना असून बीएपीएस मंदिराची भव्य रचना ही भारत व संयूक्त अमिराती यांच्यातील सांस्कृतिक सौहार्दाचे व मैत्रीचा पुरावा म्हणता येईल’, अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे.

Tags: agro tourismAshok JainGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain HillsmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In