Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

पारंपारिक पद्धतीने फळांपासून Homemade वाईन कशी बनवायची

824
SHARES
3.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दरवर्षी मोसमाच्या शेवटी वाया जाणार्या फळांपासून वाईन निर्मिती ; रत्नागिरीतील शेतकरी माधव काका महाजन (Madhav kaka Mahajan) यांचा झिरो बजेटमध्ये होममेड वाईन बनवण्याचा फॉर्म्युला ; शासन परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न होईल दुप्पट ; कोकणातील पर्यटन (kokan tourism) उद्योगाच्या जोडीने (Homemade wine) वाईन उद्योगास मिळेल चालना ; शेतकऱ्यांना (Framer) नवीन उद्योगाची संधी…...

Wine

आसव किंवा वाईन वाईन बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे . कुठल्याही फळाचा ज्यूस काढा , त्याची गोडी (Suger) २४ टक्के करा , आंबटपणा साडेतीन पीएच करा, आणि त्याला फक्त ईस्ट लावा आणि हा ज्यूस वीस दिवस काळोख्या आणि थंड जागी झाकून ठेवा. ते आपोआप फर्मेंट (Farmentation) होतं राहत . त्यातील जी साखर असते, फळांमधील पुक्टोज / ग्लुकोज असते , किंवा वरून जरी तुम्ही सुक्रोज घातली कि ईस्ट पुक्टोज आणि ग्लुकोजचे दोन भाग करते. त्यानंतर फर्मेंटेशनची प्रक्रिया आपोआप सुरु होते. बरणीत खाली बसलेला गाळ आणि वरचा चांगला रंग आलेला द्रव्य वेळोवेळी वेगवेगळा करावा. या प्रक्रियेत काही फळाची तीन महिन्यात वाईन तयार होते, तर काही फळांच्या गुणधर्मानुसार चार किंवा सहा महिने लागू शकतात.

प्रसिद्ध क्रिकेटपटू अजित आगरकरांची कोकणातील वाडी तुम्ही पहिली आहे का…….. हा व्हिडीओ नक्की बघा……..

प्रत्येक फळाचे गणित वेगळं असतं. फर्मेंटेशन झाल्यावर गाळ आणि द्रव्य वेगळं करण्याच्या प्रक्रियेला रॅकिंग (Reking) असं म्हणतात . वाइन आंबायला लागल्यानंतर, आपल्याला मिश्रण गाळण्याची आणि द्रव दुसर्‍या कंटेनरमध्ये हस्तांतरित करण्याची आवश्यकता असते. “रॅकिंग” नावाची ही प्रक्रिया कंटेनरच्या तळाशी जमलेली गाळ काढून टाकण्यास मदत करते. वाइन “क्लिअरिंग प्रक्रिया ” म्हणून देखील ओळखले जाते.

पाहुण्यांना चहा ऐवजी थर्टी/सिक्सटी पौष्टिक वाईन द्या… कोळथरेच्या माधवकाकांचा अजब सल्ला…….

रॅकिंग करून झाल्यावर शुद्ध चमकदार वाईन तयार होते. हि वाईन बाटल्यांमध्ये भरून आपण ती शासन परवानगी मिळाल्यास विक्रीसाठी ठेऊ शकतो. एकदा तयार झालेली वाईन हि अमर असते, वाईन हि जगात एकमेव वस्तू असावी कि जिला एक्स्पायरी डेट नाही. वाईन जेव्हढी जुनी होते तेव्हडी तिची किंमत हि वाढत जाते. जुन्या आणि मुरलेल्या वाईनला जास्त मागणी असून किंमत हि जास्त मिळू शकते.

सुपारीतील सोडे काढणारे यंत्र…… या यंत्राच्या साहाय्याने 15 ते 20 दिवस चालणारे काम एक ते दोन दिवसात होते……….

झिरो बजेट मध्ये वाईन निर्मितीची प्रक्रिया आपण घरच्या घरी करू शकतो . याला कुठल्याही माशिनरी, इलेक्ट्रिसिटीची गरज नसते .

जर असाव गल्लीबोळात विकलं जातं, जस शरद पवार साहेब म्हणतात ठेल्यावर विका , पोराटोरांना पाजा मात्र त्याच आसवाला वाईन म्हटलं कि सगळी गडबड होते, कायदा खूप कडक आहे . कायद्यात जर बदल केला गेला तर क्रांती घडेल . आज ना उद्या हे घडणारच आहे आणि ते येऊन ठेपलं आहे. कारण मुद्दा असा आहे कि एखाद्या शेतकऱ्याला त्याने उत्पादित केलेल्या फळाला जर पुरेसा दर नं मिळता मातीमोल भावाने ती फळं विकावे लागत असेल तर त्याने हातपाय मारायचे नाही का ? १८ फळांपैकी चार वाईन राज्य शासनाच्या स्टेट पब्लिक हेल्थ लॅबरेटरी पुणे (State public labretory pune) येथे तपासल्या गेल्यावर त्यात पॊष्टिक मूल्य आढळून आल्याचं सिद्ध झालं असल्याचा दावा कोळथरे गावातील शेतकरी माधव महाजन यांनी केला आहे. प्रायोगिक तत्वावर महाजन गेल्या दहा पंधरा वर्षांपासून संशोधन करत आहेत. वाईन निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते शासन दरबारी ते पाठपुरावा करत आहेत .

MAHAPARYATAN.COM

Via: Subscribe / Follow / Like Mahaparyatan on Youtube / Facebook & Instagram
Advertisement Banner

Comments 2

  1. Nitin Athavale says:
    5 years ago

    How to contact Mr Madhav Mahajan.

    Reply
    • Rajesh Bhagwat says:
      5 years ago

      फक्त व्हाट्सअप्प वर संपर्क साधावा
      मोबाईल – +91 94211 36122

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In