Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
रामतीर्थावर गोदा आरती सुरू होणार

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ३० जानेवारी पासुन ग्राम संवाद सायकल यात्रा

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या १२ दिवसीय ग्राम संवाद सायकल यात्रेस आरंभ

रामतीर्थावर गोदा आरती सुरू होणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 30, 2024
400 4
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गोदा आरतीकरीता स्थायी सुविधा पुरविण्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार…. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नाशिक | नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरविण्यासाठी रूपये 10 कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गोदावरी आरती संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज आहेर, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, उप वनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उप वनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, रामतीर्थ गोदावरी सेवा सेवा समितीचे सदस्य, गोदा आरती सेवा संघ सदस्य, पुरोहित संघाचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लोकप्रतिनिधी समवेत शहारात गोदा आरती सुरू करण्याबाबत चर्चा करून सर्व आवश्यक बाबी आंतर्भूत करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा. यात डिजीटल एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टीम, लाईव्ह स्क्रीनिंग, एलईडी हायमास्ट, कुशल ऑपरेटर्स यासह देखभाल व दुरूस्ती यांचा सामवेश असावा. याकामासाठी 10 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. परंतु सदर काम अडीच महिन्यांच्या कालावधीत वेगाने करण्याच्या सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, गोदा प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला 56 कोटी 45 लाखांचा आराखड्यात विद्युत विषयक, स्थापत्य विषयक, जलशुद्धीकरण प्रक्रिया विषयक बाबी, व इतर अनुषंगिक बाबींचा समावेश आहे परंतु लोकप्रतिनिधींशी चर्चा करून यात अजून आवश्यक बाबींचा समावेश करून सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा जेणेकरून मुख्यमंत्री महोदयांसमवेत यावर चर्चा करून निधी उपलब्धतेबाबत निर्णय घेता येणे शक्य होईल. या संदर्भात दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

गोदा आरतीच्या माध्यमातून नाशिक पर्यटनास मिळणार बुस्ट : डॉ.भारती पवारकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यावेळी म्हणाल्या, गोदा प्रकल्पाबाबत सुक्ष्म नियोजन करून यात आरतीसाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची व्यवस्था, आरतीच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही यासाठी प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, त्याचप्रमाणे आरतीचे लाईव्ह स्क्रिनिंगचे नियोजन सुत्रबद्धतेने झााले पाहिजे. गोदा आरती प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक पर्यटनाला बुस्ट मिळणार असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींसह समिती सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचेही मंत्री महोदयांनी स्वागत करीत यावर कार्यवाही करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.

Tags: agro tourismGodawari AartiIndia TourismmahaparyatanMahaparyatan.comnashikNashik tourismगोदा आरती
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In