Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
भवरलालजी जैन यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा दुबईत जागर

मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलनाची मेजवानी

जैन हिल्स येथे शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

भवरलालजी जैन यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा दुबईत जागर

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 19, 2023
397 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुबईत ‘कॉप-२८’ परिषदेत २०० देशांचा सहभाग l जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि अभेद्य जैन यांची उपस्थीती

जळगाव l संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एक्स्पो सिटी, दुबई येथे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या २०० देशातील सदस्यांचे ‘कॉप २८’ परिषदेचे २८ वे सत्र नुकतेच संपन्न झाले. त्यास भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी उपस्थित होते. जैन इरिगेशनला देखील या ‘कॉप-२८’ चे निमंत्रण प्राप्त झाले होते. त्यात जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन तसेच अभेद्य जैन उपस्थित होते. त्यात शेती आणि क्लाइमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादीबाबत भारताच्यावतीने चर्चा सत्रात सहभागी होऊन मत मांडण्याची संधी अनिल जैन यांना प्राप्त झाली.

यंदाच्या २८ व्या परिषदेला जगभरातील मान्यवर उपस्थित होते. या परिषदांचे आयोजन संयुक्त राष्ट्र संघामार्फत केले जाते. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी प्रभावी मार्गांचे मूल्यांकन करणे आणि युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसी) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हवामान कृतीची योजना आखली जाते. १९९५ मध्ये बर्लिन येथे पहिल्या कॉप’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर गतवर्षीची ‘कॉप २७’ इजिप्तमध्ये पार पडली होती. बदलत्या पर्यावरणातील समस्या अतिशय चिंताजनक असून येणाऱ्या काही वर्षानंतर पृथ्वीवरील तापमान प्रचंड वाढेल, करोडो वर्षांपूर्वी डायनोसरसारखे प्राणी नामशेष झाले त्याप्रमाणे मानवाचेही अस्तित्व संपेल का हा गंभीर प्रश्न अनेक शास्त्रज्ञांपुढे निर्माण झाला आहे. ऑईल आणि गॅसचा कमी वापर करून वातावरण शुद्ध राखण्यासाठी काय करता येईल? या संदर्भातील सोल्यूशन या परिषदेत गेल्या २८ वर्षापासून शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पाण्याची सुरक्षितता आणि शाश्वतता हा सुद्धा परिषदेतील महत्त्वाचा विषय होता. अन्नसुरक्षा आणि अपारंपारिक ऊर्जा याविषयात चर्चा झाली.

सोशल प्राेटेक्शन अॅण्ड क्लाइमेट चेंजच्या परिसंवादात मनोगत व्यक्त करताना अनिल जैन यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागासाठी जैन इरिगेशन त्यांना तंत्रज्ञान, मार्गदर्शन, प्रोत्साहन देते, अल्पभूधारक शेतकरी हे त्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यातून सगळ्या समाजाला उपकृत करण्याची महत्त्वाची कामगिरी करत असतात. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी विविध सामाजिक सुरक्षा उपाय राबविले जातात. ज्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ज्ञान, आणि सामाजिक प्रतिष्ठा हे घटक अंतर्भूत आहेत.’

या सह त्यांनी भारत देशाकडे प्रमुख जबाबदारी असलेल्या इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या परिसंवादात ही आपली भूमिका विषद केली.३७ वर्षांपूर्वी दूरदृष्टीने भाऊंनी काम सुरू केले असल्याची अनुभूतीजैन उद्योग समूहाच्या एकूणच वाटचालीचा अभ्यास केला असता कृषी क्षेत्रातील कामकाजात पर्यावरणाचा हाच ध्यास भवरलालजींनी घेतल्याचे अभ्यासकांना जाणवत असते. ३७ वर्षांपूर्वीच जैन इरिगेशन कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणासंदर्भातील योग्य ती भूमिका घेण्यात आली. भवरलालजींनी ३७ वर्षांपूर्वीच पर्यावरणात काय बदल होतील व त्यादृष्टीने आपण काय केले पाहिजे हे निश्चित केले होते आणि कृतिही सुरू केली होती. पर्यावरणाची भविष्यात होणारी हानी रोखण्यासाठी मी काय करू शकतो, माझी कंपनी काय करू शकते, माझे सहकारी काय करू शकतात हे ठरवून भाऊंनी उत्पादने, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम केले, अल्पभूधारक शेतकऱ्यांचेही भले व्हावे यासाठी विज्ञान, तंत्रज्ञानातून निसर्गाशी एकरूप होऊन मिळकत वाढवून समाजात संपन्नता आणि प्रतिष्ठा शेतकऱ्यांना मिळवून दिली. श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी भूमिपुत्रांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविले.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In