Monday, July 27, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
ऐतिहासिक मुंबादेवी परिसराचा होणार कायापालट

बाणगंगा परिसराचे सौंदर्यीकरण आणि विकास होणार

पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी ... डॉ. बी. एन. पाटील

ऐतिहासिक मुंबादेवी परिसराचा होणार कायापालट

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 12, 2023
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परिसराचे नूतनीकरण आणि पुनर्विकास करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने बृहद आराखडा तातडीने तयार करावा … विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबईl दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मंदिर आणि परिसर हा एक ऐतिहासिक आणि अनेक दृष्टीने महत्वपूर्ण असा विभाग आहे. त्याचे नूतनीकरण आणि पुनर्विकास करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने बृहद आराखडा तातडीने तयार करावा. विद्यमान विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिले.

विधान भवनातील अध्यक्ष यांच्या दालनात मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ५ एकर पेक्षा मोठा परिसर असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे,  मंदिराची स्वच्छता आणि सुशोभीकरण यांना प्राधान्य देणे, रस्त्याचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी टाळणे, फार मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेला ३०० वर्षांपासूनचा सोने आणि सराफा बाजार याला आकर्षक नवीन स्वरुप देणे इत्यादी बाबींवर सविस्तर चर्चा झाली. पुनर्विकासासाठीचा आराखडा करताना परिसरातील मुंबादेवी मंदिर ट्रस्ट, श्री मुंबादेवी दागिना बाजार असोसिएशन, इंडिया बुलीयन ॲड ज्वेलर्स असोसिएशन, कामनाथ मंदिर ट्रस्ट आणि अन्य छोट्या-मोठ्या व्यापारी आस्थापनांना विश्वासात घेतले जावे, असे निर्देशही ॲड. नार्वेकर यांनी दिले.

या बैठकीत प्रस्तावित नूतनीकरण संदर्भात सादरीकरण करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, सी-वार्ड चे उद्धव चंदनशीवे, माजी नगरसेवक जनक संघवी, अभियंता मनिष पडवळ, वास्तुविशारद अविनाश वर्मा, मुंबादेवी ट्रस्टचे चंद्रकांत संघवी, राजीव चोकसी, हेमंत जाधव, दागिने व्यापारी पृथ्वीराज कोठारी, ॲड.सुरज अय्यर, ॲड.संदिप केकाणे, विक्रम जैन, केतन कोठारी आदि उपस्थित होते.

Tags: agro tourismIndia TourismkokankonkanMahaparyatan.commaharashtra tourismMumbadevi
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In