Wednesday, August 5, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्री पाटणादेवी (चंडिका देवी) मंदिर, चाळीसगाव, जिल्हा जळगाव

सुवर्ण गणेशाचे प्राचीन मंदिर, दिवेआगर

English Movie - Marleshwar Cave Temple

श्री पाटणादेवी (चंडिका देवी) मंदिर, चाळीसगाव, जिल्हा जळगाव

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 22, 2020
1k 11
0
1.4k
SHARES
6.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देवीच्या १०८ शक्तिपीठांपैकी वरदहस्त शक्तीपीठ

चंडिका देवी मंदिर

याठिकाणी कसे पोहचाल

 जळगाव पासून १२० किलोमीटर आणि चाळीसगाव येथून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या गौताळा औट्रम अभयारण्य परिसरात वसलेलं प्राचीन असं श्री चंडिका देवीचं शक्तीपीठ म्हणजे पाटणादेवी मंदिर. जंगल सफारीच्या थ्रीलसह हेमाडपंथी मंदिरातील चंडिका देवीच्या दर्शनाची दुहेरी जोड साधता येईल, असे हे ठिकाण. गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. संह्याद्री पर्वताच्या कुशीत डोंगरदऱ्या, हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण आता पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. चला तर जाऊयात पाटणा देवीच्या दर्शनाला .  
गौताळा औट्रमघाट अभयारण्याच्या भव्य प्रवेश द्वारा

चंडिका देवी मंदिर

खऱ्या अर्थाने पाटणादेवीचा आनंददायी प्रवास सुरु होतो तो गौताळा औट्रमघाट अभयारण्याच्या भव्य प्रवेश द्वारापासून.  सह्याद्री पर्वताच्या रांगा, लहान/मोठे  झरे, धबधबे मनाला वेधून घेतात. दाट झाडीतून अरुंद वाटेवरून चालतांना आपण कोकणात आल्याचा भास येथे होतो. धवल तीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी उंचावर वसलेले ठिकाण म्हणजे पाटणादेवी तीर्थक्षेत्र. चाळीसगाव येथून एसटी बस किंवा खाजगी वाहनाने आपण या ठिकाणी येऊ शकतो. वाहनतळापासून मंदिरापर्यंत अंदाजे एक किलोमीटर अंतर चालत जावे लागते. मंदिर मार्गावर पूजासाहित्य, न्याहारी / भोजन व्यवस्था असलेली दुकाने थाटलेली दिसतात. खळाळत्या डोंगरी नदीवरील छोटासा साकव ओलांडून पुढे गेल्यानंतर समोरच देवी चंडिकेचे हेमाडपंथी भव्य मंदिर आणि पाठीशी असणारा प्रचंड मोठा डोंगर दृष्टीस पडतो.
काळ्या पाषाणात बांधले गेलेले चंडिका देवी मंदिर

वरदहस्त शक्तीपीठ चंडिकादेवी (पाटणादेवी) देवस्थानाचा व्हिडीओ जरूर बघा

संपूर्णपणे काळ्या पाषाणात बांधले गेलेले हेमाडपंथी मंदिर

संपूर्णपणे काळ्या पाषाणात बांधल्या गेलेल्या या हेमाडपंथी मंदिराच्या प्रवेशद्वावर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा दिसून येतात . पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण येऊन पोचतो ते पाटणादेवी या तीर्थक्षेत्री. उंच चौथ-यावर वसलेल्या या मंदिराची रचना पुर्वेभिमुख आहे. इ. स. बाराशे अठ्ठावीसच्या कालखंडात निर्माण केले गेलेले हे देवस्थान वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिर परिसरातच अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिराशेजारी उजव्या हाताला महादेव मंदिर आहे. भव्य शिवपिंडी आणि त्यामागे असलेल्या चौथऱ्यावर दोन देवींच्या मूर्ती आणि श्री गणपतीचे दर्शन भाविक घेतात. महादेव मंदिराशेजारीच श्री विष्णूचे मंदिर आहे. अंदाजे साडेचार फूट उंचीच्या विष्णू मूर्तीवर महालक्ष्मी, गरुड आणि एका ऋषींची शिल्प कोरलेली आहेत.
चंडिका देवी

गाभाऱ्यात विराजमान चंडिका देवी

चंद्राकृती आकार असलेल्या गाभारा आणि अनेक दगडी खांब असलेला सभामंडप अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात पाषाणात कोरलेला पुरातन असा शिलालेख दिसून येतो. मुख्य गाभाऱ्यात नऊ फूट उंचीची श्री देवी चंडिकेची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. मुख्य गाभाऱ्यात डाव्या हाताला मेंढ्याचे शीर तसेच गणेश मूर्ती तर उजव्या हाताला दुर्गादेवीची छोटीशी मूर्ती आहे. भगवतीचे मुखमंडल कमालीचे तेजस्वी आहे.  हिंदू धर्मातील अनेक कुटुंब या देवीला आपली कुलस्वामिनी मानतात.  या मंदिरातील चंडिका देवी हि वणी येथील सप्तशृंगी देवीची बहीण असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
वरदहस्त शक्तिपीठाच्या निर्मितीची आख्यायिका

देवीच्या वरदहस्त शक्तिपीठाच्या निर्मितीची आख्यायिका

“देवी भागवत” या ग्रंथातील शक्तिपीठाच्या कथेनुसार, आपल्याच माहेरी अपमान झाल्याने देवी पार्वतीने आपले शरीर त्यागले होते. संतप्त शंकराने आपले तिसरे नेत्र उघडल्याने हाहाकार माजला होता. त्यावेळी भगवान विष्णूंनी शंकराच्या क्रोध शांत करण्यासाठी सुदर्शनचक्र सोडून सती पार्वतीच्या शवाचे १०८ तुकडे केले. पाटण येथील डोंगरावर पार्वतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडला म्हणून या ठिकाणी वरदहस्त शक्तीपिठाची निर्मिती झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. पुरातन हेमाडपंथी मंदिरात अठरा हातांची भव्य पटना देवीची प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. वाघावर स्वार झालेल्या या देवीने प्रत्येक हातात विविध आयुध धारण केलेली असून एका हातात राक्षसाचं शीर धरलेलं दिसून येते. पुराणातील कथेनुसार चंड आणि मुंड या दैत्यांचा वध केल्यामुळे या देवीचे नाव चंडिका देवी पडले असावे. पूर्वी उंच पहाडावर वसलेले हे मंदिर, भगवतीचे उपासक गोविंद स्वामी यांनी अनेक वर्षाच्या साधनेनंतर सध्याचे मंदिर असलेल्या ठिकाणी आणल्याची आख्यायिका आहे, आजही देवीच्या मंदिरासमोर त्यांची समाधी आहे. 
विशेष चक्रपूजा

पाटणादेवी मंदिर परिसर आणि वार्षिक सण उत्सव

मंदिर परिसरात एक कालिका देवीचे मंदिर आहे . डाव्या हाताला असलेल्या काही पायऱ्या उतरून श्री कालिका मातेच्या मंदिरात जाता येते. चंडिका देवी प्रमाणेच या देवीची मूर्ती भव्य असून भाविक श्रद्धेने दर्शन घेतात. देवीदेवतांच्या भग्नावस्थेतील अनेक पुरातन मूर्ती मंदिर परिसरात विखुरलेल्या दिसून येतात. दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव आणि वासंतिक यात्रा महोत्सव याठिकाणी उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रात अष्टमीला पुजाऱ्यांतर्फे विशेष अशी चक्र पूजा बांधली जाते . दर पोर्णिमेस पाटणादेवीची महापूजा करण्यात येऊन भाविकांना माध्यान्य कालीन पूजेनंतर महाप्रसाद दिला जातो. येथे येणाऱ्या भक्तांच्या मुलभूत गरजा पुरविण्याच्या दॄष्टीने पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रातिष्ठाण या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणित आहे. भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिल्या जातात. तसेच नवस आणि इतर धार्मिक कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे. पाटणादेवी हे स्थान प्रत्येक भगवती उपासकांनी पाहण्यासारखॆ असेच आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवजरून हजेरी लावतात. 
गणितज्ञ भास्कराचार्य

गणितज्ञ भास्कराचार्यांची कर्मभूमी

पाटणादेवी परिसर म्हणजे भारतीय गणितज्ञ भास्कराचार्याची कर्मभूमी असल्याचे अनेक पुरावे आढळतात. शून्याचा आविष्कार करणाऱ्या भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला असल्याची माहिती मिळते. ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनासाठी त्यांनी या ठिकाणी एका मठाची स्थापन केली होती. भग्नावस्थेतील पुरातन मठाचे अवशेष मंदिर परिसरात दिसून येतात. भास्कराचाऱ्यांचा नातू चांगदेव यानेही अध्ययनाची सुरुवात याच मठाच्या माध्यातून केली होती असं भाविक मानतात. वनखात्याने  मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले आहे.
हे केंद्र सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळांत पर्यटकांसाठी खुले असते.
भगवान शंकराचे पुरातन हेमाडपंथी मंदिर

भगवान शंकराचे पुरातन हेमाडपंथी मंदिर

मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर पुरातन असे महादेवाचे पूर्वाभिमुख  मंदिर आहे . अतिशय सुंदर नक्षीकाम केलं गेलेलं हे मंदिर हजार वर्षांपूर्वीच असल्याचे भाविक मानतात. मुख्य गाभार्यात मोठी शिवपिंडी नजरेस पडते . संपूर्ण काळ्या पाषाणात कोरलं गेलेलं हे मंदिर ७५ लांब , ३६ फूट उंच आणि १८ फूट उंच आहे . शिवशंभोचे हे देवस्थान, पाटणा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी आवर्जून बघावं असंच आहे … 

पाटणादेवी परिसरातील इतर मंदिर आणि निसर्गरम्य ठिकाणे

निसर्गरम्य धबधबे, नदी-नाल्यांसह वनौषधींच्या समृद्धीमुळेच शासनाच्या वन विभागातर्फे या संपूर्ण परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. गौताळा अभयारण्य म्हणजे जणू निसर्गाचा मोठा खजिनाच आहे.  जवळपास आठशे औषधी वनस्पतींच्या प्रजाती येथे आढळतात . त्याचप्रमाणे २३२ प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदीदेखील या अभयारण्यात करण्यात आल्या आहेत. ससा, बिबटे, लांडगा, तरस, साप, माकडं अशा अनेक वन्यजीवांचा मुक्त संचार या परिसरात आढळतो. पावसाळ्यात धवलतीर्थ, केदारकुंड हे उंचावरून कोसळणारे धबधबे परिसरातील सौंदर्यात अधिकच भर टाकतात. पाटणादेवी परीसरातील डोंगररांगेत धवलतीर्थ, केदारेश्वर, केदारकुंड, पितळखोरे लेणी, महादेवाचे पूरातन मंदिर, कन्हेरगड हि प्रेक्षणीय स्थळे म्हणजे पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत.
भगवान शंकराचे पुरातन हेमाडपंथी मंदिर

MAHAPARYATAN.COM

आमच्या युट्युब , फेसबुक , इंस्टाग्राम , ट्विटर पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका….. 

Follow us ……..
Facebook – https://www.facebook.com/groups/849359465540532
Instagram – https://www.instagram.com/direct/t/340282366841710300949128124840132240868?hl=en

HTTPS://MAHAPARYATAN.COM/

Tags: Mahaparyatan.comआदिशक्तिचकन्हेरगडकेदारकुंडकेदारेश्वरगणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कर्मभूमीगौताळा औट्रमघाट अभयारण्याचक्रपूजाचांगदेवचाळीसगावजंगल सफारीजळगावडोंगरी नदीधवलतीर्थनवरात्र महोत्सवपितळखोरे लेणीभगवती देवीमहादेवाचे पूरातन मंदिरमहापर्यटनवणीवरदहस्त शक्तीपिठवासंतिक यात्रा महोत्सवश्री चंडिका / पाटणादेवी मंदिर (वरदहस्त शक्तीपीठ)श्री चंडिका देवीश्री पाटणादेवी मंदिरसतीसप्तशृंगीहेमाडपंथी मंदिर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In