श्रीदेव अंजनेश्वरा – बारा गावांचे स्वयंभू जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द

पालखी प्रदक्षिणा, कीर्तन , शोभायात्रा, आरती, भोवती, लोटांगण, दरबार झाडणे आदि पारंपरिक कार्यक्रम होणार
बारा गावांचे स्वयंभू जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रीदेव अंजनेश्वराच्या वार्षिक कार्तिकोत्सवाला ३ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. उत्सवाचा प्रमुख दिवस त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.
कोकणातील श्री देव अंजनेश्वर हे बारा गावांचे जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे. दरवर्षी कार्तिकोत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक पौर्णिमा असा साजरा केला जातो. कार्तिकी पौर्णिमेचा उत्सव हा पाच दिवस साजरा केला जातो. कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेला जास्त महत्त्व असून या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.
सकाळी आरती झाल्यावर पालखी सोहळ्यास सुरुवात होते. देव प्रदक्षिणेसाठी पालखीतून बाहेर पडतात. अंदाजे तासाभरानंतर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देव पुन्हा सभागृहात विराजमान झाल्यानंतर कीर्तन सोहळा पार पडतो. या वेळी इथे पंचक्रोशीतील गावांच्या भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. उत्सवकाळात कांबळी आणि काजवे ही दोन कुटुंब देवाचे भोई म्हणजे देवाची पालखी खांद्यावर वाहून नेण्याची सेवा बजावतात. भालदार म्हणून मसुरकर, अब्दागीर म्हणून मटकरी आणि कांबळी, चवरी बनवण्याचे काम देसाई आणि पटवर्धन कुटुंब बघतात, देवाच्या पालखीला दिवटी दाखवण्याचे काम मोहिते आणि पिंदावणकर कुटुंब आपली सेवा अर्पण करतात.
यावर्षी देखील या काळात विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये बुधवार २ नोव्हेंबर रोजी नवीन निशाणकाठी स्थापना कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
आज रविवार ६ नोव्हेंबर रोजी लघुरूद्र स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती होउन रात्री मिठगवाणे गावातील समस्त तेली समाज बांधवांतर्फे शोभायात्रा मिठगवाणे चौक ते अंजनेश्वर मंदिर अशी काढण्यात आली होती. या दिवशी सर्व मंदिर परिसर कडूतेलाच्या प्रकाशात उजळून निघाला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार , आमदार तसेच तेली समाज संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अंजनेश्वर विश्वस्त मंडळ व मिठगवाणे तेली समाज सेवा मंडळाचेवतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बलीपूजन, दुपारी १२ वाजता देवाला महाप्रसाद, दुपारी १२.३० ते २.३० या वेळात भाविकांना महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता त्रिपूर पूजन, रात्री १२ वाजता आरती, भोवती, लोटांगण, दरबार झाडणे आदि पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ २ वाजता लळीताचे कीर्तन सुरू होऊन पहाटे ४ वाजता उत्सवाची सांगता होणार आहे.
तरी भाविकांनी दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त श्री देव अंजनेश्वर देवस्थानचेवतीने करण्यात आले आहे.
- गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेसगणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
- PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई१ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
- एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
- “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानापालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन




