पंतप्रधान गतिशक्ती आराखड्यांतर्गत पाचोरा-जामनेर मार्गाच्या गेज परिवर्तन व विस्ताराची शिफारस
मध्य रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांना पाचोरा स्थानकावर उतरून जगप्रसिध्द अजिंठा येथे जाण्यास सोईस्कर आणि किफायतशीर असलेली – PJ Railway Line
नवी दिल्ली l जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्तार करण्याची शिफारस ‘प्रधानमंत्री (पीएम) गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्या’ च्या नियोजन गटाने केली आहे.
या रेल्वे लाईनचे गेज परिवर्तन आणि विस्तारीकरण झाल्यानंतर येथून हायस्पीड गाड्या चालवल्या जातील. त्यामुळे जामनेर आणि पाचोरा परिसरातील प्रवासी देशातील कुठल्याही भागात सहजरीत्या प्रवास करू शकतील.
पाचोरा-जामनेर पी.जे रेल्वे चे काम अधिक जोरात होणार असल्याने जामनेर, पहूर, सोयगावकरांचा मुंबई प्रवास अधिक फास्ट होणार आहे. पाचोरा आणि जामनेर या दोन तालुक्यांना जोडणारा पी.जे रेल्वे मार्ग आता रुंदीकरण करण्यात येणार आहे.
पाचोरा जामनेर ट्रेन (PJ Line) झाली 104 वर्षांची झाली – पाचोरा-जामनेर’ या नॅरोगेज मार्गावर धावणाऱ्या आणि ‘पीजे’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. मुंबईच्या मे. शपुर्जी गोडबोले अॅण्ड कंपनीने या छोट्या रेल्वे मार्गाचे बांधकाम केले व ११ जुलै १९१८ रोजी पाचोरा ते पहूरपर्यंतच्या मार्गावर ही रेल्वेगाडी धावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वर्षभरात पहूर ते जामनेर मार्ग तयार झाला आणि पाचोरा-जामनेर मार्गावर पीजे रेल्वे धावू लागली
‘पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्या’च्या संस्थात्मक चौकटीअंतर्गत स्थापन केलेल्या नेटवर्क नियोजन गटाने परीक्षणाअंती बुधवारी पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गासह देशातील एकूण तीन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची शिफारस केली असल्याचे पत्र सूचना कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दुर्गम भागातील माल वाहतुकीला गती मिळण्यासाठी आणि वाहतूक खर्चात कपात होण्याच्या अनुषंगाने हे तीन्ही प्रकल्प महत्वाचे आहेत.
पाचोरा-जामनेर रेल्वेमार्गाचे गेज परिवर्तन व विस्तार – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जामनेर मार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्ताराच्या या ८४ कि.मी.च्या प्रकल्पासाठी ९५५ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे.
या प्रकल्पामुळे जळगाव आणि भुसावळला बाह्य दुहेरी मार्ग जोडला जाणार असून यामुळे नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) ते नागपूर आणि देशाच्या पूर्वेकडील राज्यांत जलद गतीने मालवाहतूक करण्यास मदत होणार आहे.
३००० दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून पीएम गतिशक्तीच्या नियोजन गटाने देशातील तीन महत्त्वाचे प्रकल्प निश्चित केले आहेत.
शिफारस केलेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पासह उत्तर प्रदेशातील गोरखपूर छावणी -वाल्मिकीनगर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि बिहार व पश्चिम बंगालमधील कटिहार-मुकुरिया आणि कटिहार-कुमेदपूर मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पांचाही समावेश आहे.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,599)
- Mahaparyatan Business (5)
- Mahaparyatan Marketing (1)
- Sports / क्रीडा (13)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (22)
- कथाकथन / प्रवासवर्णन (3)
- कृषी पर्यटन (20)
- कृषी माहिती आणि उत्पादने (111)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (19)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (28)
- प्राचीन देवस्थाने (58)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
- समुद्रकिनारे (17)
- साहसी पर्यटन (9)


