Monday, August 3, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषदेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

वन पर्यटनातून ‘शहानूर’ होणार उद्योगपूर्ण गाव

महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषदेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 22, 2022
412 4
0
573
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार

कृषी पर्यटन केंद्र सुरू करताना काय नियोजन करावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषद २०२२ पार पडली. यावेळी, अनेक तज्ज्ञ आणि मान्यवरांनी शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिलेल्या शेतकरी बांधवांच्या यशोगाथा सांगितल्या. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नाचा एक नवा स्रोत निर्माण करणे आणि महानगरातील पर्यटकांना आपल्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवण्यासाठी नवे माध्यम निर्माण करणे या हेतूने यावेळी सादरीकरण करण्यात आले. कृषी पर्यटन केंद्र सुरू करताना काय नियोजन करावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विभाग व कृषी पर्यटन विकास कंपनी (एटीडीसी) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात राज्यात नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना पुरस्कृत केले गेले.

16 मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो पर्यटन संचालनालय (DoT) मुंबई यांनी जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद 2022 यशवंतराव चव्हाण सेंटर ,नरिमन पॉईंट, मुंबई आयोजीत करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मिलिंद बोरीकर संचालक पर्यटन संचालनालय , डॉक्टर धनंजय सावळकर सहसंचालक पर्यटन संचालनालय, श्री पांडुरंग तावरे सदस्य राज्यस्तरीय कृषी पर्यटन समिती श्री महाजन सदस्य राज्य स्तरीय कृषी पर्यटन या मान्यवरांच्या हस्ते ते परिसंवादाचे दिपप्रज्वलन करण्यात आले.

कृषी पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कृषी पर्यटन केंद्र चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे बंदेवाडी येथील देवगिरी कृषी पर्यटन केंद्राचे सुखदेव शामराव गिरी, सातारा जिल्ह्यातील मौजे बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंदराव गणपत शिंदे, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या मौजे रामपूर येथील सावे कृषी पर्यटन केंद्राचे आदित्य प्रभाकर सावे, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या मौजे वळती येथील मामाचं वावर कृषी पर्यटन केंद्राचे मोहन जगताप, जळगाव जिल्ह्यातील अंजाळे येथील नंदग्राम गोधाम कृषी पर्यटन केंद्राचे अभिलाश संतोषकुमार नागला, वर्धा जिल्ह्यातील मौजे वालधूर येथील रानवारा कृषी, निसर्ग व ग्रामीण पर्यटन केंद्राचे राजेंद्र सोभागमलजी डागा, रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्राचे चंदन चंद्रशेखर भडसावळे, औरंगाबाद जिल्ह्यातील मौजे वडगाव येथील वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्राचे रवींद्र भीमराव पाटील तसेच औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील मिर्जापूर येथील सृष्टी कृषी पर्यटन केंद्राच्या प्रतिभा किरण सानप यांचा समावेश होता. या कार्यक्रमात कोकण विभागातील श्री चंद्रशेखर भडसावळे सगुना बाग कर्जत यांना कृषी पर्यटन कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातून जवळपास 350 शेतकरी  यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

त्याच प्रमाणे पुरस्कार देण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन करण्यात आले.तसेच या परिसंवादात इतर कृषी तज्ञांनी विविध विषयावर सादरीकरण  केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कल्पना साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हनुमंत कृ. हेडे उपसंचालक ( पर्यटन) कोकण विभाग, नवी मुंबई यांनी केले.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismMtdc resortsMumbai Konkan
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In