Monday, November 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
शेगाव सुप्रसिद्ध कचोरी निघाली विदेशी (Video)

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा

सांगितीक सुरेल मैफलीने बालगंधर्व महोत्सवाची सुरवात

शेगाव सुप्रसिद्ध कचोरी निघाली विदेशी (Video)

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 27, 2022
470 5
0
653
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेगाव कचोरी / Shegaon Kachori / शेगांवकी करारी कचौडीया

Gandhi Teerth – Jain Hills

शेगाव ।। संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (Gajanan Maharaj) यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी. हजारो भाविक महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी येथे दररोज होत असते. शेगावची अजून एक ओळख म्हणजे येथील प्रसिद्ध कचोरी.

गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक भाविक आवर्जून येथे कचोरीचा आस्वाद घेतोच. एव्हडेच नाही तर ही कचोरी आपल्या घरी/गावी पार्सल म्हणूनही नेली जाते. आजमितीस ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही शेगाव कचोरी मिळू लागली आहे.

शेगावची कचोरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. ही कचोरी म्हणजे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ. बारा महिन्यात कोणत्याही वेळेस खाता येईल अशी ही शेगावची कचोरी आज 71 वर्षांची झाली आहे. या कचोरीचे जनक श्री. तिरथराम शर्मा हे हिंदुस्थानाची फाळणी झाल्यानंतर आपल्या परिवारासह शेगावात स्थलांतरित झाले.

५ जून 1950 रोजी त्यांना शेगावच्या रेल्वे स्टेशनच्या कँटीनचा ठेका मिळाला. या कॅंटीनमध्ये त्यांनी कचोरी विकणे सुरु केले. गरमागरम कचोरीसोबत दिली जाणारी तिखट मिरची फ्राय लोकांना आवडू लागली. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी हळूहळू वाढू लागली. कालांतराने त्यांनी सुरु केलेल्या कॅंटीनचे रूपांतर मोठ्या दुकानात झाले. कोणत्याही वेळेस येथे आल्यास गरम कचोरी ग्राहकांना दिली जाते.

श्री शर्मा यांनी कुटुंबाच्या चरितार्थासाठी सुरु केलेल्या व्यवसायाने इतिहास घडवला. चव आणि दर्जा या बाबत कोणतीही तडजोड केली जात असल्याने हि कचोरी कालांतराने शेगावची नवी ओळख बनली.

फळांपासून निर्मित पौष्टीक वाईन

सद्यस्थितीत श्री तिरथराम शर्मा यांची चौथी पिढी या व्यवसायात असून आज श्री गगन (तिरथराम शर्मा यांचे नातू) शर्मा यांचे सुपुत्र करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता गगन्स शेगाव कचोरी सेंटरचा व्यवसाय पाहतात.

शेगावचे कचोरी निघाली विदेशी – ही कचोरी लवकरच परदेशातही मिळणार आहे. ग्राहकांना घरच्याघरी गरमागरम शेगाव कचोरी मिळावी यासाठी संशोधन करून फ्रोजन कचोरीचा पर्याय शर्मा कुटुंबीयांनी दिला आहे. विशेष असे तंत्रज्ञान वापरुन फ्रोजन स्वरूपात तयार केली जाते. त्यामुळे आपल्याला हवी तेव्हा हि फ्रोझन कचोरी आपण घरीच तळुन आपल्या कुटुंबियांसह त्याचा आस्वाद घेऊ शकणार आहे.

फॅक्टरीत कसे तयार होतात खाण्यायोग्य काजूगर

सिक्रेट मसाला – आलं, लसूण, हिरवी मिर्ची आणि स्वतः तिरथराम शर्मा यांनी तयार केलेला सिक्रेट मसाला वापरून हि कचोरी तयार केली जाते. शर्मा यांचा मसाला म्हणजे या कचोरीच्या चवीचं गमक आहे असं म्हणता येईल.

हा व्हिडीओ बघा आणि आपल्या आवडत्या फळांपासून वाईन बनवा ।। ते ही घरच्याघरी

शेगाव कचोरी सामान्य तापमानाला ३ दिवस तर फ्रीजमध्ये ३ महिन्यांपर्यंत टिकते असे शर्मा यांनी सांगितले.

Tags: Gagans Shegaon KachoriGajanan Maharajsharma KachoriShegaonShegaon Sansthanतिरथराम शर्माशेगावशेगाव कचोरीसंतश्रेष्ठ श्री गजानन महाराज
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In