Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
संगमेश्वर मंदिर, सासवड – Video

पुढील तीन दिवस कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

लतादीदींनी गायलेल्या अभिजात संगीतावर आधारित घरंदाज सूर या दृकश्राव्य अविष्काराने रसिक तल्लिन

संगमेश्वर मंदिर, सासवड – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
534 5
0
742
SHARES
3.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
संगमेश्वर मंदिर संपुर्ण माहितीसाठी हा व्हीडिओ नक्की बघा…..

प्राचीन स्थापत्य कलेचा अदभूत आणि उत्कृष्ट नमूना असलले संगमेश्वर मंदिर

श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची समाधी आणि श्री कऱ्हाबाई मंदिर याच परीसरात आहेत

सासवड गाव आणि इतिहास :
शिवपूर्वकाळापासून एक महत्त्वाचे महसुली आणि सैनिकी ठाणे म्हणून प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक गाव म्हणजे सासवड. शहाजीराजे यांच्या जहागिरीतले हे गाव. या गावाचे भौगोलिकदृष्ट्या महत्त्व वेगळे आहे. त्याकाळी दळणवणासाठी अत्यंत सोयीचे ठिकाण असल्याने पुण्याच्या संरक्षणासाठी सासवडला अनन्यसाधारण महत्त्व होते. सासवडच्या जवळपास अनेक अनेक ऐतिहासिक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर सासवडचं धार्मिक आणि ऎतिहासिक महत्व संस्मरणीय असंच आहे. प्राचीन स्थापत्य कलेचा अदभूत आणि उत्कृष्ट नमूना असलेली संगमेश्वर, नारायणेश्वर, चांगावटेश्वर, सिध्देश्वर अशी चार पांडव कालीन शिवमंदिरे याच परिसरात आहेत. आज आपण सासवड गावात असलेल्या संगमेश्वर मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत.

इथे कसे जायचे : पुण्याहून आल्यास हडपसर – दिवेघाट मार्गे सासवड हे अंतर अंदाजे ३५ किलोमीटर इतके आहे.

खाजगी वाहनाने आपण तासाभरात येथे पोहचू शकतो. या मार्गावर पुण्याहून १७ किलोमीटर अंतर असलेल्या वडकी गावापासून ते सासवडपर्यंतचा प्रवास अतिशय संस्मरणीय असाच आहे. संह्याद्रीच्या पर्वताच्या रांगा, हिरव्यागार वनराईने नटलेला परिसर बघत आपण पोहचतो ते दिवेघाटात. आषाढ़वारीला महाराष्ट्रात अनन्यसाधारण असे महत्व आहे. आळंदीहून प्रारंभ होणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी हि याच मार्गाने पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असल्याने हा ९६५ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग माउली पालखी महामार्ग म्हणून ओळखला जातो. दिवेघाट चढून गेल्यावर डाव्याहाताला खाली ऐतिहासिक मस्तानी तलावाचे विहंगम दृश्य नजरेत भरते. दिवे घाट संपताना उंचावर असलेल्या विस्तीर्ण परिसरात विठ्ठलाच्या ४५ फुटी भव्य मूर्तीचे दर्शन होते. इथून अंदाजे दहा किलोमीटर पुढे गेल्यास सासवड या ऐतिहासिक गावात पोहचता येते.

प्राचीन संगमेश्वर मंदिर :
सासवड बसस्थानका पासून १ कि.मी अंतरावर संगमेश्वर हे स्वंयभू महादेवाचे मंदिर आहे. गावातील पुरंदर तहसील कार्यालयावरून पुढे गेल्यावर नदीवरील छोटा पूल ओलांडतांना डाव्या हाताला प्राचीन अशा संगमेश्वर मंदिराच्या परिसराचे विलोभनीय दृश्य आपल्याला दिसते. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या दोन नद्यांच्या संगमावर असल्याने या देवस्थानास संगमेश्वर असे नाव पडले असावे. संगमावरील हा पूल ओलांडल्यावर डाव्या हाताला श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची समाधी आणि श्री कऱ्हाबाई मंदिर लागते. पुढे आल्यावर आपण येऊन पोहचतो ते श्री संगमेश्वर मंदिर परिसरात.

कोकणातील अतिशय सुंदर शिवस्थान

संगमेश्वर मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले असून एक लहानसा कोट उभारुन त्यावर मंदिर उभारलेले आहे. मंदिराच्या तीन बाजूस नदीत उतरणारा दगडी घाट बांधलेला आहे. मुख्य मंदिर जरी उंच ठिकाणी असले तरी मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला पायथ्याशी असलेल्या बांधीव घाटांवर दोन प्राचीन शिव मंदिरे आहेत. उत्तरेस असलेल्या चांबळी नदीकाठावर प्राचीन महादेव मंदिर आणि भव्य नंदी शिल्प आणि दक्षिणेस असलेल्या कऱ्हा नदी तीरावर असलेल्या घाटावर खडकेश्वर आणि माता सतींची पुरातन मंदिर दिसून येतात.

भोगावती अथवा चांबळी नदीवरील अशातच बांधलेला छोटा लोखंडी साकव ओलांडून पुढे गेल्यावर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात. वर चढून गेल्यावर समोर दृष्टिस पडते ते प्राचीन संगमेश्वर मंदिर. मंदिर परिसर खूप मोठा असून चारही बाजूने तटभिंती बांधलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्य दगडी भिंतीवर केलेले नक्षीकाम कमालीचं सुंदर आहे. कळसावरील गोपूरांवर हि बारीक नक्षीकाम केलेले असून त्यावर कोरलेली असंख्य देवदेवतांची शिल्पे बघून आपण थक्क होते. मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर असून नंदीगृह, सभामंडप आणि गाभारा हे यादवकालीन शैलीत बांधला गेल्याचा आणि कळसाचा भाग हा नंतर पेशवेकाळात मराठा शैलीत बांधला गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस संगमेश्वर मंदिराची निर्मिती झाली असल्याचा अंदाज अभ्यासक वर्तवतात. मंदिरासमोरच एक भग्नावस्थेतील पुरातन नंदी शिल्प आहे. नंदी मंडप, त्याच्या पुढे भव्य सभामंडप आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या प्राकारात दोन सुंदर दगडी दीपमाळा दिसतात.

कोकणातील अतिशय सुंदर शिवस्थान

वैशिष्ट्यपूर्ण नंदी शिल्प : भक्कम दगडी खांबावर आधारलेले नंदीगृहात असलेला काळ्या पाषाणातील भव्य नंदी वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. अंदाजे सहा फूट उंची असलेल्या नंदी शिल्पाच्या पाठीवर दोन नागफण्या कोरलेला आहेत. घंटा / घुंगुरमाळ, पाठीवर झूल आणि अंगावर विविध अलंकाराने विभूषित असा हा नंदी आहे. मूर्तीच्या गळ्यात असलेल्या घंटेखाली एका साधूचे छोटेसे शिल्प दिसते. संगमेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख जरी असले तरी समोर असलेल्या या नंदीचे तोंड परंपरेनुसार पश्चिमेकडे नसून त्याने मान उत्तरेकडे फिरवलेली असल्याचे दिसून येते. आपल्या लाडक्या भगवान शंकराकडे न बघता नंदी शिल्पाने आपली मान पश्चिमेस का फिरवली आहे ? याचे कारण मात्र कळू शकले नाही. नंदीगृहात शेंदूर अर्चित हनुमान आणि गणेश प्रतिमा आहेत.

मंदिराचे भव्य सभागृह अनेक भक्कम दगडी खांबांवर आधारलेले असून मध्यभागी बारीक कोरीवकाम असलेले कासव शिल्प आहे. या सभामंडपाला दोन प्रवेशद्वारे आहे.

गर्भागाराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गणेशपट्टि आणि चौकटीवर पानाफुलांच्या वेलबुट्टी आहे. आतमध्ये काळ्या पाषाणातील भव्य शिवपिंडी आहे. संगमेश्वराच्या शिवलिंगावर अभिषेक पात्रातून सतत अभिषेक सुरु असतो. भक्तगणांना गाभाऱ्यात प्रवेश करून दर्शन घेण्याची परवानगी असल्याने भाविक स्वहस्तानेही अभिषेक आणि पूजन करू शकतात. शिवपिंडीच्या मागील बाजूस असलेल्या कोनाड्यात शेंदूर लेपन केलेली श्री गणेश मूर्ती आहे.

वार्षिक सण उत्सव :
दरवर्षी येणारी महाशिवरात्री, त्रिपुरी पौर्णिमा आणि श्रावणी सोमवार हे इथले प्रमुख उत्सव . त्रिपुरारी पौर्णिमेला दोन दीपमाळा आणि घाट पायऱ्यांवर लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशात परिसर उजळून निघतो. इथे बोलला नवस पूर्ण होत असल्याची श्रद्धा असल्याने उत्सव काळात दर्शनासाठी भाविकांची गर्दी परिसरात असते. सासवड गावात आल्यास एकदा तरी भेट देऊन दर्शन घ्यावे असे हे ठिकाण आहे.

नित्यपूजा :
मंदिराच्या देखभालीसाठी पुजाऱ्यांची नेमणूक केली गेलेली नसून सासवड गावातील शिवभक्त एकत्र येत नित्यपूजा, मंदिराची झाडलोट, दिवाबत्ती आणि इतर धार्मिक कार्य लोकसहभागातून करत असतात.

वैशिट्यपूर्ण तुळशी वृंदावन :
मंदिराच्या परिसरात असलेल्या पुरातन तुळशी वृंदवनाची रचना ही अतिशय कल्पक अशीच आहे. सहा फुट उंचीच्या या तुळशीवृंदावनाच्या खाली पाया, मध्यभागी छोटेसे शिवलिंग आणि वरती तुळस लावलेली दिसून येते. या तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडत असल्याने शिवपिंडीला आपोआप अभिषेक केला जातो. असे वैशिट्यपूर्ण तुळशी वृंदावन अभावानेच बघायला मिळते.

निवास आणि भोजन व्यवस्था :
देवस्थानचे स्वतःचे भक्त निवास नाही. सासवड हे गाव मोठे असून येथे अनेक हॉटेल्स, निवासगृहे आणि भोजनालये असल्याने आपल्या बजेटनुसार राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय येथे होऊ शकते.

मंदिर परिसराजवळील इतर पर्यटन स्थळे :
मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला ‘कऱ्हाबाईचे’ देखील मंदिर पाहायला मिळते. याच ‘कऱ्हाबाई मंदिराच्या’ शेजारी श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची समाधी आहे. समाधी परिसरात पेशव्यांचा पूर्णाकृती पुतळा असून आजूबाजूचा परिसर फुलझाडे लावून सुशोभित करण्यात आला आहे. हे तेच थोर व्यक्तिमत्व ज्यांच्या पोटी बाजीराव पेशव्यांनी जन्म घेऊन मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावला होता. संगमेश्वराच्या मंदिराजवळच रणसंग्राम गाजवणारे वीर मराठा सेनानी गोदाजी जगताप यांची ही समाधी आहे.

पुण्याजवळील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Agastya Sea View Apartments, Dapoli
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismPlaces to visit near punePuneratnagiri tourismपुरंदरश्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथश्रीवर्धनसासवड
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In